जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ७०० ते ८०० प्लॉटसाठी करोडो रूपये रुपातरंण अधिमुल्य घेणे चुकीचे – सतेज नलावडे
सन १९८३/८४ ला शासनाकडून कुवारबाव गावामध्ये ३ गुंठ्याचे ७००-८०० प्लॉट शासनाकडून लाखो रुपये विना सवलत भरून घेऊन वितरीत करणेत आले. त्यावर कुवारबाव वासियानी सदनिका बांधल्या. त्यावेळी अधिमुल्य भरल्यानंतर शासनाचे महसुल विभागाने स्वतंत्र अभिलेखही तयार केले. बऱ्याच सहकारी संस्थांचे भोगवाटा २ ते १ केले त्या बाबतचे पुरावे ही आमचेकडे आहेत.
अचानकपणे संस्थांचे ७/१२ भोगवटा १ चे परत २ कोणतेही पत्र न देता २०१९/२० ला करणेत आले व याचे कारण विचारले असता आधी चुकून झाले होते असे तोंडी उत्तर महसुल विभाग देत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय सर्व संस्थांकडून रुपातंरण अधिमुल्य म्हणून २५% घेणार होते परंतु आम्ही सर्व संस्थानी आक्षेप घेतल्यानंतर १०% टक्के करणेत आले. परंतु आमचे म्हणणे नुसार सर्व प्लॉट धारकानी १९८३/८४ ला विना सवलतीच्या दराने अधिमुल्य भरुन प्लॉट घेतल्यामुळे आता ही फी आकारणी म्हणजे दोनदा फी आकारल्या प्रमाणे आहे यामुळे सर्व प्लॉट धारकांना मिळून करोडो रुपये भुर्दंड बसणार आहे हे अन्यायकारक व बेकायदेशीर आहे असे आमचे मत असुन तसे पत्रही आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाला दिेले आहे.
हा चुकीचे निर्णय मागे न घेतलेस आम्ही माहामहीम राज्यपाल महोदय यांचेकडे दाद मागणार असुन व तसेच सनदशीर मार्गाने आंदोलन करणार आहोत.
www.konkantoday..com