कोल्हापूरहून साखरेची पोती घेऊन जयगडकडे जाणारा ट्रक आंबा घाटातील १०० फुट दरीत कोसळला

ट्रकचा चक्काचूर; चालकाने उडी मारल्याने बचावला, दहा लाखांच्या साखरेचेही नुकसान

रत्नागिरी : दहा लाख रुपयांची साखरेची पोती कोल्हापूरहून जयगडकडे घेऊन जाणाऱ्या ट्रकला आंबा घाटातील कळकदरा येथे अपघात झाला. चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक १०० फुट खोल दरीत जाऊन कोसळला. हा अपघात सोमवारी मध्यरात्री रात्री १.३० वाजण्याच्या सुमारास घडला. ट्रकचा अक्षरशः चक्काचूर झाला असून चालक बचावला आहे.

याबाबत देवरूख पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, धीरज जगन्नाथ गाडेकर (वय-३३, रा. करवीर, जि. कोल्हापूर) असे या भीषण अपघातात जखमी झालेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. धीरज आपल्या ताब्यातील (MH09/CA-1491) या ट्रकमध्ये साखरेची पोती भरून हा ट्रक कोल्हापूरहून जयगडकडे घेऊन येत होता. ट्रक कळकदरा येथे आला असता ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक खोल दरीत कोसळला. यावेळी धीरज याने जीव वाचवण्यासाठी ट्रकबाहेर उडी मारली. अपघाताची माहिती मिळताच साखरपा पोलीस दूरक्षेत्राचे पोलिस कॉन्स्टेबल तानाजी पाटील यांनी होमगार्ड मंगेश शिंदे यांच्यासह तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दरीत अडकलेल्या चालकाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. इतर वाहनचालकांना मदतीला घेऊन दोरीच्या सहाय्याने जखमी धीरजला दरीबाहेर काढण्यात आले. अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button