रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या सहकार्याने रत्नदुर्ग किल्ल्यावर राजरत्न प्रतिष्ठान व वात्सल्य सिंधू सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता मोहीम
महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार असलेल्या जयंतीनिमित्त्य आज दिनांक 21/03/2022 रोजी रत्नागिरी शहरानजिकच्या रत्नदुर्ग किल्ल्यावर राजरत्न प्रतिष्ठान व वात्सल्य सिंधू सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पोलीस अधीक्षक डाॅ. मोहित कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा पोलीस दल यांच्या सहकार्याने एकत्रितपणे साफसफाई व स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही साफसफाई आज रोजी सकाळी 8 ते 10.30 वा.दरम्यान करण्यात आली.
श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांनी निर्माण केलेले गड – किल्ले हे आजही आपणां सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. भविष्यात पुढील पिढीलाही प्रेरणादायी ठरण्याच्या दृष्टीने अशा गड – किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवणे अत्यंत आवश्यक आहे या उद्देशातून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली आणि एका अतिशय वेगळ्या प्रकारे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती या सर्वांनी साजरी केली . या मोहिमेत राजरत्न प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. रूपेश सावंत, वात्सल्य सिंधू सेवाभावी संस्था अध्यक्ष श्री. अनिरुध्द खामकर, राखीव पोलीस निरीक्षक श्री. रमेश निकम तसेच राजरत्न प्रतिष्ठान व वात्सल्य सिंधू सेवाभावी संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि रत्नागिरी जिल्हा पोलीस दलातील पोलीस मुख्यालय येथील 45 पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.
www.konkantday.com