केळवत येथे पुलाचा कठडा तोडून डंपर कोसळला नदीपात्रात


मंडणगड : केळवत येथे पुलाचा कठडा तोडून डंपर नदीच्या पात्रात कोसळला. या अपघातात डंपरचा चालक जखमी झाला. अपघातात गाडीखाली अडकलेल्या चालकाचा हात बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अपघातस्थळी तीन जेसीबी मागवून चालकाला बाहेर काढण्यात आले. सोमवारी दुपारी ही घटना घडली. विसापूर येथील डांबराच्या प्लांटवरून रस्त्याच्या कामाकरिता वापरात येणारी डांबरमिश्रीत खडी भरून हा डंपर जात होता. रेणुका कंस्ट्रक्शन कंपनीचा हा डंपर असून केळवत या ठिकाणी चालकाचा ताबा सुटल्याने डंपर पुलाचा कठडा तोडून नदीपात्रात कोसळला. आसपासचे ग्रामस्थ घटनास्थळी गोळा झाले व डंपरखाली अडकलेल्या चालकास सोडवण्याकरिता प्रयत्न करू लागले. विभागीय पोलिस निरीक्षक काशीद यांच्या सूचनेनुसार पोलिसांनी रेस्क्यू मोहीम राबवली. यावेळी प्रतीक पोतनीस, योगेश जंगम, राकेश गायकवाड, सुशील जागुष्ठे, नगरसेवक मुश्ताक दाभिळकर, इरफान बुरोंडकर, आल्पेश भोसले, यांनी मदत कार्यात सहभाग घेतला. घटनेचे वृत्त काळताच तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलिस निरीक्षक शैलजा सावंत, पंचायत समिती सदस्य नितीन म्हामुणकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button