रत्नागिरीत राज्य संगीत नाट्य स्पर्धेचे उद्घाटन
रत्नागिरी : सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६० वी महाराष्ट्र राज्य संगीत नाट्य स्पर्धा २०२१-२२ ची अंतिम फेरी रत्नागिरी येथे होत आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा रत्नागिरी येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात गुरुवारी पार पडला.
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. गजानन रानडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन झाले. यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे सदस्य भाग्येश खरे, परीक्षक – मुकुंद मराठे, अर्चना साने, विलास कुडाळकर, ज्ञानेश पेंढारकर, विजय कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेला रसिक प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे स्पर्धा समन्वयक नंदू जुवेकर यांनी सांगितले.