प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांची मातृमंदिर संस्थेला भेट
प्रसिद्ध अभिनेत्री चिन्मयी सुमित यांनी आज मातृमंदिर देवरुख संस्थेला भेट दिली. यावेळी कार्यालयातील प्रदर्शनाच्या माध्यमातून संस्थेचे मागील 65 वर्षाचे काम व सध्याचे उपक्रम समजून घेतले.
स्वतः मराठी भाषा प्रेमी व मराठी शाळेच्या आग्रही पुरस्कर्त्या असलेल्या चिन्मयी सुमित यांनी मातृमंदिरच्या प्रसाद बालक मंदिरचा प्रवास व प्रयोगशील प्राथमिक शाळेची पुढील योजना याबाबत आंनद व्यक्त केला. तसेच गोकुळ बालगृहातील मुलींशी महिला दिनाच्या निमित्ताने संवाद साधला. मुंबईत शिक्षणासाठी येणार असाल तर अगदी हक्काने लोकल गार्डियन म्हणून माझं नाव दया व इतर मदतीसाठी निसंकोच कॉल करा असं आश्वासन त्यांनी मुलींना दिले.
आज धावती फेरी असली तरी मुद्दाम वेळ काढून संस्थेचं एकूण काम समजून घ्यायला येईन व कोणत्याही बाबतीत माझी मदत होणार असेल तर मी तुमच्या सोबत आहे असं त्यांनी सांगितलं.