रेल्वेने विकसित केलेल्या कवच तंत्रज्ञानाची आज यशस्वी चाचणी
भारतीय रेल्वेसाठी आजचा दिवस खूप ऐतिहासिक होता. रेल्वेने कवच तंत्रज्ञान विकसित केले आहे. या तंत्रज्ञानाची आज चाचणी घेण्यात आली.ती यशस्वी ठरली आहे. यासाठी १६० किमी प्रती तासाच्या वेगाने दोन ट्रेन एकमेकांच्या दिशेने येत होत्या. एका ट्रेनच्या इंजिनामध्ये रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव होते. या ट्रेन एकमेकांपासून अवघ्या ३८० मीटरवर येऊन थांबल्या आणि सर्वांना हायसे वाटले.
रेल्वे मंत्र्यांनी याचे व्हिडीओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केली आहे. सनतनगर-शंकरपल्ली विभागामध्ये ही चाचणी घेण्यात आली.
कवच’ हे असे तंत्रज्ञान आहे ज्यामुळे दोन रेल्वे कधीच एकमेकांवर आदळणार नाहीत. ही जगातील सर्वात स्वस्त यंत्रणा आहे. रेल्वेला झिरो अॅक्सिडेंटचे लक्ष्य गाठायचे आहे. यासाठी आणि अपघातातील हानी टाळण्यासाठी कवच ही यंत्रणा बनविण्यात आली आहे. या तंत्राज्ञानामुळे जर या डिजिटल सिस्टिमला रेड सिग्नल किंवा अन्य कोणती नादुरुस्ती किंवा मानवी चूक दिसली तरी रेल्वे जागच्या जागी थांबते. एकदा का ही यंत्रणा लागू झाली की ती राबविण्यासाठी प्रती किमी ५० लाख रुपयांचा खर्च येणार आहे. जगभरात यासाठी २ कोटी रुपये खर्च येतो.
www.konkantoday.com