विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरात “गूड लॅबोरेटरी प्रॅक्टिस” कार्यशाळा
दिनांक 28 फेब्रुवारी 2022 रोजी मुंबई विद्यापीठाच्या रत्नागिरी उपपरिसरात ‘ गूड लॅबोरेटरी प्रॅक्टिस ‘ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करून राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.उपपरिसरातील एन.एस.एस विभाग आयोजित या कार्यशाळेत गोगटे जोगळेकर महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक तसेच केमिकल इंडस्ट्रीमध्ये बर्याच वर्षाचा अनुभव असलेले डॉ.विजयकुमार रानडे सर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.कार्यशाळेच्या सुरूवातीला डॉ.सी.व्ही. रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
उपरोक्त विषयावर विज्ञान दिनाचे औचित्य साधून कार्यशाळा घेण्याची संकल्पना मांडणारे रत्नागिरी उपपरिसरा चे प्रभारी संचालक डॉ.किशोर सुखटणकर सर यांनी आपल्या प्रास्ताविकात रामण इफेक्ट बद्दल विद्यार्थ्यांना सांगताना सी. व्ही. रामण यांच्या संशोधनासाठी वाहून घेतलेल्या जीवना प्रवासाबाबत अवगत केले.प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना मिळणारे निष्कर्ष आणि त्याचे विश्लेषण पूर्णपणे मन लावून केल्यास त्यातून चांगल्या प्रतीचे संशोधन होऊ शकते,असे ते यावेळी म्हणाले. विद्यार्थ्यांचे संशोधन प्रकल्प तसेच नियमित प्रयोगामध्ये योगदान अपेक्षित असून स्वतंत्र विचार सरणी आणि कष्ट करण्याची वृत्ती महत्त्वाची आहे असे त्यांनी प्रतिपादन केले.या कार्यशाळेदरम्यान उपपरिसरात चालणाऱ्या इंडस्ट्रीयल सेफ्टी अॅण्ड मॅनेजमेंट या कोर्सला प्रवेशित कु.महाडिक याने आपल्या मनोगतात कोर्सचे त्याला आलेला अनुभव व करीयर च्या दृष्टीने असलेले महत्त्व सांगितले.
प्रमुख वक्ते डॉ. रानडे सर यांनी प्रयोगशाळेतील दुर्लक्षित पण तितक्याच महत्त्वाच्या नियमांची उजळणी केली. कोविड काळात गेले दोन वर्ष प्रयोगशाळा पासून अलिप्त असलेल्या विद्यार्थ्यांना प्रयोगशाळेतील वर्तन कसे असावे या बाबत पुन्हा योग्य माहिती मिळण्याकरिता आयोजित या कार्यशाळेत रानडे सरांनी प्रत्यक्ष उपकरणांचा योग्य वापर करून दाखवला. प्रयोगशाळेत प्रवेश केल्यानंतर काय करावे? काय करु नये? या बद्दल त्यांनी विस्तृत मार्गदर्शन केले.या मार्गदर्शनात आपत्कालीन परिस्थिती मधे फायर एक्स्टिंग्विशर,Sand बकेट इमरजन्सी एक्झीट ,प्रथमोपचार पेटी प्रयोगशाळा नकाशा याचे अनन्यसाधारण महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना ओघवत्या वक्तृत्व शैलीत पटवून दिले.या सोबत त्यांनी प्रयोगशाळा अपघात प्रसंगाचे रंगीत तालीमचे महत्त्व सांगितले.प्रयोगशाळेतील एॅक्सप्लोझिव केमिकल, टाॅक्सिक केमिकल, कर्सिनो जेनिक केमिकल या बाबत विद्यार्थ्यांना योग्य माहिती असणे गरजेचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.प्रयोगशाळेत वावरत असताना केमिकल काळजीपूर्वक न हाताळल्यास अथवा नियमाचे पालन केल्यास एखादी छोटी चुक सुद्धा कशी महागात पडू शकते हे त्यांनी आपल्या काॅलेज जीवनातील अनुभवातून स्पष्ट केले.विद्यार्थ्यांनी प्रमुख वक्त्यांशी संवाद साधत कार्यशाळेत उस्फूर्त प्रतिसाद दिला.रत्नागिरी उपपरिसर चे प्रभारी संचालक डॉ. किशोर सुखटणकर तसेच सहाय्यक कुलसचिव श्री. अभिनंदन बोरगावे यांचे सदर कार्यशाळेच्या आयोजनात मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेच्या यशस्वी पूर्ततेसाठी एन.एस.एस विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.सोनाली मेस्त्री,प्रा गुरव ,प्रा निलेश रोखले यांचे सहकार्य मिळाले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन रत्नागिरी उप परिसराच्या एन.एस.एस स्वयंसेवक यांनी केले,तसेच कु.हर्षदा मेस्त्री,कु.साक्षी साळके, कु.पावसकर यांनी सूत्रसंचालन केले.