राज्य कलाप्रदर्शनासाठी ‘सह्याद्री’ सावर्डेच्या 29 विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड
सावर्डे : कलासंचालनालय मुंबईच्यावतीने महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी घेण्यात आलेल्या 61 व्या महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शनासाठी सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे या चित्र-शिल्प कला महाविद्यालयातील 29 विद्यार्थ्यांच्या कलाकृतींची निवड झाली आहे. तसेच प्रा. रुपेश सुर्वे यांचे ‘क्युरिऑसिटी ऑफ मान्सून’ या शिल्पाची निवड झाली आहे. या प्रदर्शनासाठी महाराष्ट्रातील अनेक कलामहाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा सहभाग असतो. या प्रदर्शनात विद्यार्थ्यांची कलाकृतीची निवड होणे ही महत्त्वाची बाब असते. निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत अभ्यासक्रम -शर्वरी सावंत, प्रथमेश लिंगायत, प्रथमेश गोंधळी, कलाशिक्षक पदविका प्रथम वर्ष मृणाल पंडित, सुयश शिगवण, मयुरी निमण, कलाशिक्षक पदविका द्वितीय वर्ष स्नेहा मोंडकर, दिनेश गावणकर, वैष्णवी शेडगे, अतिश रेशीम, रेखा व रंगकला विभाग- सुजल निवाते, संकेत कदम, करण आदावडे, आदित्य साळवी, सायली कदम, प्रणय फराटे, ऋतिका शिरकर यांनी यश मिळवले. शिल्प व प्रतिमानबंध कला विभागात विशाल मसणे, तुषार पांचाळ, शुभम पांचाळ, प्रणीत मोहिते, दर्शन गावडे, अभिनव धामणस्कर, विश्वनाथ धामणस्कर, प्रदीप कुमार, गौरव सलगर, साईराज मिराशी, सोहम घोडे, राकेश साईल या विद्यार्थ्यांच्या कलाकृती कलाप्रदर्शनात झळकणार आहेत. या वर्षीचे 61वे महाराष्ट्र राज्य कलाप्रदर्शन रत्नागिरी येथे होणार आहे.