
मुंबई-गोवा महामार्गावर नेरकेवाडीयेथे भरधाव कारने दुचाकीला धडक दिल्याने महिलेचा मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावर नेरकेवाडी येथे कोळेकर फार्म हाऊस समोर मारूती कारने दुचाकी स्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघात दुचाकीच्या पाठीमागे बसलेल्या एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकी चालक गंभीर जखमी झाला . शनिवारी आज सकाळी ९.३० वाजण्याच्या दरम्यान हा अपघात घडला.
सौ.सविता सखाराम पुजारी ( रा. नेरकेवाडी ) असे या मृत महिलेचे नाव आहे. तर या अपघातात तीचा मुलगा सुहास सखाराम पुजारी (२५) हा गंभीर जखमी झाला आहे. शनिवारी सकाळी सुहास हा आपल्या दुचाकी (क्र. एम. एच. ०८,ए. व्ही. ८६९७) वरून आई सौ. सविता हिला घेवून नेरकेवाडी कडून राजापूरकडे येत होता. तो नेरकेवाडी येथील कोळेकर फार्म जवळ आला असता याच दरम्यान मुंबई कडून गोव्याच्या दिशेने भरधाव वेगात येणाऱ्या मारूती सुझीकी अल्टो कार (क्र. एम. ०६, ए. एस. ७६२९) च्या चालकाने पाठीमागून जोरदार धडक दिली. यात सुहास व त्याची आई गंभीर जखमी झाली हाेती
www.konkantoday.com