कोकणातील रेल्वे स्टेशनचे कॅन्टीन व स्टॉल परप्रांतीयांना दिलेत तर गप्प बसणार नाही -शौकत मुकादम
कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी, चिपळूण-मडगांव -रोहा येथे पूर्वीचे कॅन्टीन आहे व ९ वर्षाने कॅन्टीन व स्टॉलचे टेंडर निघाले आहेत. कोकणातील जेवढे रेल्वेस्टेशन आहेत त्या रेल्वे स्टेशनचे कॉन्ट्रॅक्ट परप्रांतीयांना देण्याचे वरिष्ठ अधिकार्यांनी कट रचला आहे. स्थानिकांचे अर्ज असूनदेखील त्यांना डावलून इतरांना ठेके दिले जात आहेत. कर्नाटक उडपी येथील व्यक्तींना रत्नागिरी रेल्वे स्टेशनचे टेंडर कसे देण्यात आले. स्थानिक लोकांचे अर्ज असतानाही त्यांना कसे डावलले जाते, असे कराल तर याद राखा. आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे.
www.konkantoday.com