महाविकास आघाडीचे चिपळूण येथेही रास्ता रोको आंदोलन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदररीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे.याप्रश्नी महाविकास आघाडीने चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता यावेळी मंत्री उदय सामंत यानी देखील आंदोलनस्थळी भेट दिली यावेळी मंत्री उदय सामंत यांनी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी संपर्क साधला त्यावेळी त्यानी या महामार्गाचे काम तातडीने सुरू करण्याचे आश्वासन दिले असल्याने हे आंदोलन आता स्थगित करण्यात आली असल्याचे सांगितले
हातखंबा, पाली, चिपळूण, लांजा आणि राजापूर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला होता. महामार्ग रोखणार्या शिवसैनिकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.
www.konkontoday.com