आडेली जांभरमळा येथे अंगणवाडी शाळे मध्ये दर्शनी भिंतीवर काढलेलं एस.टी बसचं हुबेहुब सुंदर चित्र सद्या सर्वांचा चर्चेचा विषय
वेंगुर्ले तालुक्यातील वजराट गावचे सुप्रसिद्ध चित्रकलाकार साईकृष्ण कांदे यांनी तालुक्यातील आडेली जांभरमळा येथे अंगणवाडी शाळे मध्ये दर्शनी भिंतीवर काढलेलं एस.टी बसचं हुबेहुब सुंदर चित्र सद्या सर्वांचा चर्चेचा विषय ठरत असून त्याला सोशल मीडियावरही मोठा प्रतिसाद लाभत आहे.
तसेच संप काळात हे सुंदर एस.टी.बसचं चित्र काढल्या मुळे सध्या हे चित्र सर्व ठिकाणी सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. वजराट अंगणवाडी येथील या एसटी बस चित्रा प्रमाणेच कांदे यांनी शाळेच्या भिंतीवर लहान मुलांना आकर्षित करतील अशी काढलेली अभ्यासपूर्ण चित्रही या गावासह तालुक्यात चर्चेचा विषय ठरत आहे.
www.konkantoday.com