राजापूरचे माजी उपनगराध्यक्ष विलास पेडणेकर यांचा शिवसेनेला रामराम
राजापूर : अवघ्या महिनाभरापूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेल्या राजापूरचे माजी उपनगराध्यक्ष व राजापूर तालुका व्यापारी संघाचे सचिव विलास पेडणेकर यांनी शिवसेनेला रामराम ठोकला आहे. दोन महिन्यापूर्वी आपण शिवसेनेत प्रवेश केला होता. भाजप किंवा भाजपच्या कोणत्याही नेत्यांवर नाराज न होता, मनात कलुशित विचार न ठेवता वा पक्षाला कुठलीही बाधा येऊ न देता शिवसैनिक व शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेत्यांवर विश्वास ठेवून मी शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. मात्र माझा भ्रमनिरास झाला. शिवसेनेतील प्रामाणिक नेते, कार्यकर्ता यांच्याशी माझे मित्र म्हणून जिव्हाळ्याचे संबंध राहतीलच मात्र आपली पुढील माझी दिशा लवकरच जाहीर करू, असेही पेडणेकर यांनी प्रसिध्दी पत्रकात नमूद केले आहे.
www.konkantoday.com