दापोली तालुक्यातील पालगड येथे एसटी बसवर दगडफेक

दापोली तालुक्यामधील पालगड या ठिकाणी मंडणगडवरून दापोलीकडे येणाऱ्या एसटी बसवर अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली. यात चालक जखमी झाला असून बसचे सुद्धा नुकसान झाले आहे. दापोली पोलिस ठण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दापोली पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार एसटी चालक अनंत दयाळकर (वय ५०) हे दापोली आगारामधील आपल्या ताब्यातील बस (एम . एच . 14 बी. टी. 1371) घेऊन २ जानेवारी रोजी मंडणगडवरून दापोलीकडे येत होते. संध्याकाळी ७.१५वा. च्या सुमारास ते पालगड या ठिकाणी बस घेऊन आले.
त्यावेळी जोशी बंगल्याच्या पुढे अज्ञात मोटरसायकलस्वारांनी चालत्या बसवर अंधारातून दगड भिरकावले. तेव्हा बसच्या समोरील काचेवर दगड लागून काच फुटली तो दगड चालक अनंत दयाळकर यांच्या उजव्या पायाला लागून त्यांना दुखापत झाली. या घटनेमध्ये बस चे १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलिस फौजदार मिलिंद चव्हाण करीत आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button