रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली
रत्नागिरी जिल्ह्यात पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असतानाही जिल्ह्यातील काही नागरिकांचे बेफिकिरीचे वागणे संक्रमण वाढीसाठी कारणीभूत होऊ शकते म्हणून पोलिसांनी हे पाऊल उचलले.जिल्ह्यातील २५७ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तर रत्नागिरी शहरात मारूती मंदिर, मांडवी, जयस्तंभ, भाटये याठिकाणी शहर पोलिसांकडून विशेष लक्ष ठेवण्यात आले होते
www.konkantoday.com