
नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरीच सेलिब्रेट करणाऱ्या लाखो लोकांनी स्विगी आणि झोमॅटोवरून दिलेल्या खाद्य ऑर्डरीचीआकडेवारी डोळे फिरवणारी
नववर्षाच्या पूर्वसंध्येला घरीच सेलिब्रेट करणाऱ्या लाखो लोकांनी स्विगी आणि झोमॅटोवरून जेवण आणि इतर खाद्य पदार्थांची ऑर्डर दिली होी. याची आकडेवारी डोळे फिरवणारी ठरली. एका मिनिटाला तब्बल ७ हजाराहून जास्त ऑर्डर्स या दोन्ही अॅप्सवर येत असल्याची आकडेवारी त्यांनी जाहीर केली आहे. आत्तापर्यंतचा हा सर्वोच विक्रम ठरल्याचं देखील त्यांनी जाहीर केलं आहे. झोमॅटो आणि स्विगी मिळून रात्री ९ वाजेपर्यंत प्रत्येकी तब्बल २० लाखाहून जास्त ऑर्डर्सची नोंद केली होती!स्विगीनं आपल्या ट्विटर हँडलवर यासंदर्भात ट्वीट करून माहिती दिली. या ट्वीटनुसार रात्री ९ वाजेपर्यंत स्विगीकडे आलेल्या ऑर्डर्सची संख्या तब्बल २० लाखांहून जास्त होती!दुसरीकडे झोमॅटोचे प्रमुख दीपिंदर गोयल यांनी देखील ट्वीट करून माहिती दिली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री ११ वाजेपर्यंत झोमॅटोवर तब्बल २५ लाखाहून जास्त ऑर्डर्सची नोंद झाली होती. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांनी मिळून ३१ डिसेंबरला रात्रीपर्यंत सुमारे ५० लाखांच्या ऑर्डर्स घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.
www.konkantoday.com