लोटेत परराज्यातून येतोय अवैधरित्या रासायनिक माल
लोटे औद्योगिक वसाहतीत परराज्यातून प्रक्रिया केलेला रासायनिक कारखान्यांसाठीचा माल मोठ्या प्रमाणात अवैधरित्या आणला जात आहे. ही बाब खेड मधील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी उघड केली आहे.
रविवारी असेच दोन ट्रक सुमारे 50 टन माल घेऊन दाखल झाले. संशय आल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली असता तेथे बिना लेबल ची पोती भरलेली आढळून आली. हा माल कोणी तयार केला याची कोणतीही निशाणी यावर नसल्याने संशय बळावला आहे.
दोन राज्यांच्या सीमा पार करून बिना लेबलचा सुमारे 50 टन माल महाराष्ट्रात दाखल होतो, याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे संजय आखाडे यांनी केली आहे.
www.konkantoday.com