महाविकास आघाडी सरकारचा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न
महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातील चौथ्या दिवसाचं कामकाज आज होईल. महाविकास आघाडीनं विधानसभा अध्यक्ष निवडणुकीसाठी नियमात बदल केलेल आहे.अध्यक्षांची निवड गुप्त मतदान पद्धतीनं न करता आवाजी मतदानानं करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारनं अध्यक्षपदाचा निवडीचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठवलेला आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर प्रक्रिया पुढं जाईल, अशी माहिती आहे. मात्र, त्याचवेळी महाविकास आघाडी सरकारचा विधानसभा अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती आहे. याबरोबरच भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन मागे घेण्याबाबत देखील निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती आहे
www.konkantoday.com