उदय सामंत सृजनशील संयमी नेतृत्व

रत्नागिरीचे आमदार आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री ना. उदय सामंत हे प्रतिभासंपन्न, संयमशील, जनतेच्या आणि विशेषत: युवकांच्या प्रश्नांची अचूक जाण असणारे, सर्वांना सोबत घेतांना विरोधकांनाही आपलेसे करणारे आणि राज्याच्या शतरंजपटावर चाणाक्ष मुत्सद्दीपणाची मोहारे उमटविणारे प्रभावशाली नेतृत्व आहे. कोकणाला आणि विशेषत: रत्नागिरी जिल्हयाला असे चतूरस्त्र नेतृत्व लाभल्याने अनेक दशकांच्या बॅकलॉग नंतर कोकणच्या (कॅलीफोर्नियन) विकासाची स्वप्ने वास्तवात येत आहेत. कोकण विकासाला दूरगामी परिप्रेक्षाचा नवा आयाम मिळत आहे.
पाली सारख्या एका छोटया खेडयातून यूवा क्रिडा संघटन माध्यमातून सुरु झालेली उदय सामंत यांच्या प्रवासाने गेल्या 15-20 वर्षात विस्मयचकीत करणारा पल्ला गाठला आहे. राजकारणात महत्वाचा टप्पा गाठण्यासाठी राजकारणातील कौटुंबीक परंपरा आणि पार्श्वभूमिची गरज लागते. गॉडफादर लागतो. त्यातही रत्नागिरी जिल्हयाला तर मोठी स्वप्ने पहाण्याची सवय नाही आणि आवाकाही नाही. उदय सामंत यांनी या पारंपारीक संकल्पना मोडीत काढत त्यांनी संधी निर्माण केल्या. काही प्रसंगी अपयशांना संधीत रुपांतर करत त्यावर आरुढ होत आपली बेफाम दौड अधिकच तूफानी केली. आता या तुफानाला रोकणे अशक्य आहे. राज्याच्या राजकिय क्षितीजावरील अत्यूच्च संधी त्यांना खूणावत आहेत. आणि त्या संधीचे सोन करण्याची विलक्षण तेज:पूंज क्षमता त्यांच्यात विकसीत होत आहे. महाराष्ट्राला लाभलेले हे प्रतिभासंपन्न, प्रगल्भ नेतृत्व या कोकणच्या लाल मातीतील आहे आणि या लालमातीच्या प्रत्येक अणू रेणूशी असणारे नात्याचे भान आपल्या प्रत्येक निर्णयातून जागृत ठेवत आहे. हा रत्नागिरी आणि कोकणवासीयांसाठी अभिमानाचा आणि गौरवाचा क्षण आहे.

सामंत यांची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून असणारी कारकिर्द तर अधिकच प्रभावी आहे. यापूर्वी गेल्या एक-दिड दशकातील शिक्षण मंत्र्यांच्या कारभाराचा विचार केला तर त्यांची पूर्ण कारकिर्दच वादग्रस्त ठरली. चुकीचे विद्यार्थी शिक्षक यांना मारक निर्णय, पेपर फुटी, विद्यापीठातील गलथानता आणि भ्रष्टाचार यामुळे काही शिक्षण मंत्र्यांना तर राजीनामा द्यावा लागला होता. या पार्श्वभूमिवर उदय सामंत यांच्याकडे उच्च शिक्षण खाते आल्यावर अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. त्यातही कोविड महामारी यातून सारी यंत्रणाच ठप्प झालेली. मात्र या काळातील उदय सामंत यांची कामगिरी अत्यंत उल्लेखनिय होती. कोविड काळात प्रत्येक माणूस उंबरठयाआड अडकून बसला होता. रस्त्यावर चिटपाखरू नसायचे या परिस्थितीत उदय सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हयातील गावागावात फिरत होते. रत्नागिरी जिल्हा मतदार संघ तर सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री म्हणून त्यांनी आरोग्य यंत्रणा अत्यंत क्षमतेने आणि वेगाने राबविली. कोविडची पर्वा न करता स्वत: कोविड योध्यापेक्षा क्षमतेने फिरत राहीले.
या काळातील त्यांचे शैक्षणिक पातळीवरचे निर्णय अत्यंत अभ्यासपूर्ण होते आणि तेवढेच ठामही होते. कोविड काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होता कामा नये सासाठी सर्व विद्यापीठ कुलगुरु यांना सोबत घेत अद्ययावत तंत्रज्ञानाचा आणि प्रणालीचा वापर करत ऑनलाईन यंत्रणा, शिक्षण आणि परिक्षा प्रणालीत अवलंबीत करत कोविड काळातील महाअडचणींवर मात केली आणि लाखो विद्यार्थ्यांना स्थैर्याचा आधार दिला. विद्यार्थी, प्राध्यापक, संस्थचालक यांचे सोबत सातत्याने थेट ऑनलाईन माध्यमातून संपर्क ठेवला. त्याकाळात प्रचंड टिका आणि प्रश्नांची सरबती होत असताना अत्यंत संयमी वृत्तीने लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या हिताला प्राधान्य देण्याचा विचार आणि निर्णय फार महत्वाचा आणि दूरगामी होता. त्यामुळेच आजपर्यंतच्या इतिहासात सर्वाधिक लोकप्रिय शिक्षण मंत्री म्हणून लाखो विद्यार्थ्यांचा प्रतिसाद लाभलेला मंत्री म्हणून उदय सामंत यांची सोशल मिडीयात सन्मान आहे.
उच्च शिक्षण मंत्री पद सांभाळतांना रोजच्या कार्यभारा बरोबरच त्यातील नाविण्य, संशोधन विकास आणि नवनव्या कल्पनांचा अवलंब ही वैशिष्ठये सामंत यांच्या कल्पक आणि चतूरस्त्र कार्यपध्दतीत दिसतात. त्यातूनच रत्नागिरी हा शैक्षणिक हब बनविण्याची संकल्पना येत्या काही वर्षात वास्तवात येत आहे वैद्यकीय महाविद्यालय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे संगीत महाविद्यालय, कोकण सागरी संसाधनाच्या सुयोग्य वापरासाठी सागरी विद्यापीठ, युनानी वैद्यकीय महाविद्यालय, संस्कृत विद्यापीठ, पैठण येथे संतपीठ स्थापना, अभियांत्रिकी महाविद्यालय (शासकीय), महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी नवीन शासकीय मराठी महाविद्यालय, नक्षल आणि आदिवासी भागात गोंडवान विद्यापीठ विशेष योजना, कवी कुलगुरु कालीदास विद्यापीठ केंद्र आदी विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम रत्नागिरी सिंधुदुर्ग सोबतच महाराष्ट्राच्या विविध भागात सुरु करत त्याला आर्थिक तरतूद करण्याचा निर्णय सामंत यांच्या कारकिर्दीत घेण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील हा अद्ययावत नवा दृष्टीकोन महाराष्ट्राच्या उच्च विशक्षणाला नवा आयाम आणि नवा दृष्टीकोन देणारा आहे. याची खरी प्रचिती पुढील पाच वर्षात कोकण आणि महाराष्ट्राला येणार आहे.
आमदार आणि पालकमंत्री म्हणून जिल्हा नियोजन आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या माध्यमातून रस्ते, पाणी, आरोग्य या प्राथमिक सुविधांची कामे होत असतात. आपला मतदारसंघ सांभाळण्यासाठी त्याला प्राधान्यही दिले जाते. मात्र हया व्यतिरिक्त अनेक नव्या संकल्पना मांडणे त्या संदर्भातील योजनांची नव्याने मांडणी करणे शासकीय पातळीवर त्याचे महत्व विषद करत अथवा कधी खास बाब त्या प्रदेशाकरीता म्हणून मान्य करून घेत त्याची अंमलबजावणी करणे यासाठी जो एक मोठा आवाका आणि व्यापक दृष्टीकोन देणे ही सामंत यांची विशेष वैशिष्ठय मानले पाहिजे. त्यातूनच बाळासाहेब ठाकरे अद्ययावत तारांगण, जे जे स्कूल आर्ट स्कूलच्या तज्ञ समितीच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरीचे एैतिहासिक सुशोभिकीकरण, लोकमान्य टिळक स्मारक जनत, गेट वे ऑफ रत्नागिरी मांडवी जेट्टी सुशोभिकरण, आगळेवेगळे प्राणी संग्राहालय, राणी लक्ष्मीबाई कुलदैवत लक्ष्मी पल्लीनाथ पाली विकास आराखडा, कोकणच्या हजारे वर्षाच्या इतिहासाची साक्ष देणारी कातळशिल्प जतन, आरे-वारे— भाटे पर्यटकांसाठी मुलभूत सुविधा आदी पर्यटन विकास प्रकल्प राबविले आहेत.
आ. उदय सामंत यांच्या कोटयावधीच्या विकास कामांची जंत्री फार मोठी होईल. मात्र त्याहीपेक्षा महत्वाचे त्यांचे राज्याच्या राजकिय पटलावरील अधिकाधिक तेजस्वी आणि वलयांकित होत जाणारे स्थान. एक धुरंधर राजकिय नेतृत्व म्हणून ते अत्यंत प्रभावशाली नेते मानले जातात. आपल्या पक्षा सोबतच अन्य राजकीय पक्षांतील त्यांचे संबंध अत्यांत सलोख्याचे आहे. परिणामी अनेक अडचणींच्या राजकीय पेच प्रसंगी उदय सामंत हा हूकमाचा एक्का ठरतो. राजकीय नेतृत्वाची हवा डोक्यात न गेल्याने पाय जमिनीवर आणि संवाद थेट समोरच्या सर्वसामान्यांशी हे त्यांचे वैशिष्ठय आहे. अत्यंत धावपळीच्या कार्यमग्नतेतही येणाऱ्या प्रत्येकाला ते वेळ देतात. आणि त्यांचे काम करणारच असा त्यांच्याबद्दल विश्वास वाढत आहे. त्यांच्याकडे येणाऱ्या कामाचे नियोजन अप्रतिम आणि अचूक आहे. वेळेच्या बाबतीतही त्यांची अचूकता उत्तम आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाला यशवंतराव चव्हाण यांच्या आदबशीर, पुरोगामी कार्यप्रणालीचा वारसा आहे. जाणता राजा मा. शरद पवार, अजित दादा ते सुनिल तटकरे यांच्याकडे तो चालत आला. यातील काही उत्तमता उदय सामंत यांनी अचूकपणे उचलली आहे. झपाटल्याप्रमाणे काम करतांनाही त्यांचे भान अचूक असते. प्रश्नांची जाण उत्तम आणि नेणीवेकडे जाणारी आहे.
कोकणाने अत्यंत बुध्दीमान नेतृत्व देशाला आणि राज्याला दिली. त्यातील काहींची बुध्दीची प्रखरता आणि तेजस्विता इतकी विलक्षण होती त्यातून कोकण रेल्वेसारखे जगातील आश्चर्य मानले जावे असे स्वप्न प्रत्यक्षात भूतलावावर अवतरले. मात्र तरीही कोकण दारिद्रयरेषेच्यावर आला नाही. रोजगारासाठी येथील तरुण मुंबईकडेच धावत राहीला. आम्ही आमच्या नेतृत्वाला भरभक्कम आधार दिला नाही. आज काळ बदलत आहे. कोकण बदलत आहे. उदय सामंत यांच्या रुपाने एक प्रगल्भ, मुत्सद्दी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असणारं नेतृत्व राज्याच्या उच्च शिक्षण विभागाचे नेतृत्व करत आहे. यापुढील काळात या जबाबदाऱ्या अधिक विस्तारत जाणार आहेत. आम्ही म्हणतो शरद पवार यांची बारामती साऱ्या महाराष्ट्राचेच नव्हे तर देशाचे शिक्षण उद्योगाचे आदर्श मॉडेल होते. उद्या रत्नागिरी का नाही होणार ? यासाठी नेतृत्वाच्या मागे प्रसंगी पक्षभेद विसरुन उभे रहाणे गरजेचे आहे. उदयजींच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देताना त्यांच्या या वेगवान विकास कार्याला गतीमान करण्यासाठी संपूर्ण रत्नागिरी आणि कोकण या कार्यात त्यांच्या सोबत नक्की असेल याच आमच्या मन:पूर्वक शुभेच्छा !

अभिजित हेगशेटये, चेअरमन
नवनिर्माण शिक्षण संस्था, रत्नागिरी तथा कार्याध्यक्ष, मातृमंदिर, देवरुख

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button