फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय मासिकाच्या शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी यांचा समावेश
फोर्ब्स या आंतरराष्ट्रीय मासिकाने शक्तिशाली महिलांच्या यादीत पुण्याच्या प्रतिमा जोशी यांचा समावेश केला आहे.डिसेंबर २०२१च्या अंकात त्यांच्यावर विशेष लेख प्रसिद्ध करण्यात आला असून, सामाजिक कामात अग्रेसर असल्याबद्दल त्यांचा सन्मानपूर्वक उल्लेख आहे.
व्यवसायाने वास्तूरचनाकार असलेल्या जोशी सन १९८७पासून झोपडपट्टीतील रहिवाशांच्या आरोग्याचा स्तर उंचावण्याचे काम करत आहेत. राज्यातील ७ शहरांमध्ये त्यांचे काम असून, मागील काही वर्षात त्यांनी ‘शेल्टर’ संस्थेच्या माध्यमातून २५ हजार शौचालयांचे बांधकाम केले आहे.
या कामासाठी त्यांनी अभ्यासपूर्वक पद्धत विकसित केली आहे. शौचालयांच्या बांधकामांबरोबरच झोपडपट्टयांमधील घरांना त्यांची स्वत:ची खास ओळख ‘गुगल’च्या माध्यमातून मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न त्यांनी केला. याचबरोबर झोपडपट्टीत कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करण्यातही त्यांनी यश मिळवले.
www.konkantoday.com