लोकसत्ताच्या ‘पूर्तता समारंभात’ मान्यवरांकडून मातृमंदिर देवरूखच्या कामाचे कौतुक…
ज्येष्ठ नेत्रतज्ञ डॉ. तात्याराव लहाने, लोकसत्ता संपादक गिरीश कुबेर यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकसत्ताचा ‘ पूर्तता सोहळा ‘ सोमवारी २० डिसेंबर रोजी माटुंगा – मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी बोलताना डॉ तात्याराव लहाने यांनी ‘समाजकार्याची साखळी निर्माण करणारा दानयज्ञ ‘ म्हणून लोकसत्ताच्या ‘सर्वकार्येषु सर्वदा’ या उपक्रमाचे कौतुक केले. याप्रसंगी मातृमंदिरचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये, उपाध्यक्ष जगदीश नलावडे,कार्यवाह आत्माराम मेस्त्री व सुहास बने हे प्रतिनिधी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत दरवर्षी महाराष्ट्रातील निवडक १० संस्थांच्या कामाला प्रसिध्दी दिली जाते. यावर्षी ‘मातृमंदिर देवरूख’ संस्थेच्या कामाबद्दल विशेष आर्टिकल करण्यात आले होते. यामाध्यमातून महाराष्ट्रभरातून मोठी आर्थिक मदत मातृमंदिर साठी आली.
देवरूख परिसरातील आरोग्य व्यवस्थेची स्थिती पाहता इंदिराबाई हळबे (मावशी)यांनी १९५४ सली सुरू केलेल्या ‘मातृमंदिर हॉस्पिटल ‘ चे अत्याधुनिक सुविधांसह ‘Super Multi speciality Hospital’ मध्ये रुपांतर करण्याचा एक मोठा उपक्रम मातृमंदिर संस्थेने हाती घेतला आहे. यासाठी या उपक्रमांतर्गत लोकसत्ताच्या वाचकांनी भरभरून मदत केलेली आहे, त्या सर्वांचे आभार मानून दुर्गम भागातील गोरगरीब रुग्णांसाठी मागील ६५ वर्ष सुरू असलेल्या या ‘अरोग्यायज्ञा’ साठी आपणही हातभार लावावा असे आवाहन संस्थेचे कार्याध्यक्ष अभिजित हेगशेट्ये यांनी केले.
www.konkantoday.com