राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा कायम -राष्ट्रवादीचे नेते बशिर मुर्तूजा
आमची महाविकास आघाडी म्हणून आगामी रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणुक लढवण्यासाठी कोणाशीही चर्चा झालेली नाही, उलट हि निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी आमची तयारी झाली आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिकचे सदस्य बशिर मुर्तूझा यांनी केले त्याचवेळी आघाडीचा पर्यायही खुला असून जे राष्ट्रवादीचे नगरसेवक म्हणून निवडून येऊन सेनेसोबत काम करत आहेत त्यांनी आपली चूक मान्य केल्यास त्यांना पुन्हा संधी देण्याची तयारी असल्याचेही स्पष्ट केले.रत्नागिरी नगरपरिषदेची येत्या 23 डिसेंबर ला मुदत संपत आहे. त्यामुळे केव्हाही निवडणूक घोषित होणार आहे. या पार्श्वभुमीवर या निवडणूकीतही महाविकास आघाडीची चर्चा सुरु झाली आहे. सेनेकडून तसे वक्तव्य करण्यात आले आहे. मात्र त्याबाबतचा खुलासा करण्यासाठी राष्ट्रवादी कडून घाईघाईने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेदल राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेट्ये, बशीर मुर्तूझा, माजी नगराध्यक्ष मिलींद कीर, शहराध्यक्ष निलेश भोसले, तालुकाध्यक्ष राजन सुर्वे उपस्थित होते. या न.प.निवडणूकीसाठी राष्ट्रवादीने आपापल्या इच्छूक उमेदवारांना कामाला लावले असल्याचे बशीर मुर्तूझा, कुमार शेट्ये यांनी सांगितले. शहरातील नागरिकांचा त्यांना चांगला
पाठिंबा मिळत आहे. या निवडणूकीसाठी महाविकास आघाडी होणार की नाही हा प्रश्न आहे असे सांगत ती होणारच नाही असे मात्र ठामपणे यावेळी राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले नाही. यावर बोलताना मुर्तुझा राष्ट्रवादीने निवडणूक स्बळावर सर्वच्या सर्व जागांवर लढण्याची तयारी पूर्ण केलेली आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांमध्येही कोणताही संभ्रम बाळगू नये. उमेदवारांना निवडणूकीसाठी बळ देवून ती लढवली जाणार आहे. महाविकास आघाडीबाबत इतरांकडून कोणताही प्रस्ताव आलेला नाही किंवा चर्चाहि झाली नाही. किंवा वरीष्ठ नेत्यांकडून कोणत्याही प्रकारच्या सूचना आलेल्या नाहीत. स्थानिक नेते यासंदर्भात चर्चा एकत्र चर्चा करून निर्णय घेतील. महाविकास आघाडीचा प्रस्ताव जर राष्ट्रवादीकडे आला तर येथील परिस्थिती लक्षात घेत संघटनेच्या वरिष्ठांच्या कानावर बाब घातली जाईल. वरिष्ठ पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो या निवडणूकीसाठी ग्राह्य धरला जाईल. मात्र तोपर्यंत येथील राष्ट्रवादीचा स्वबळाचा नारा कायम राहणार आहे असे त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com