चाळीस दिवसांनी आढळले जयगड येथील बेपत्ता बोटीचे अवशेष

0
78

जयगड येथून साधारणपणे ४० दिवसांपूर्वी समुद्रात बेपत्ता झालेल्या नावेद-२ बोटीचे सामान शनिवारी मिळून आले.
दीड महिन्यानंतर ४ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास जयगड येथील समुद्रात मासेमारी करायला गेलेल्या पडवे येथील नौकेवरील खलाशांना समुद्रात बोटीचे अँकर, दोरी व छोटी जाळी असे सापडून आले.

नासीर हुसैनमिया संसारे यांची जयगड बंदरातून २६ ऑक्टोबर रोजी नावेद-२ ही बोट मासेमारीला गेलेली असताना बेपत्ता झाली होती. त्यानंतर पाच दिवसांनी या बोटीवरील एका खलाशाचा मृतदेह आढळला होता. त्यानंतर या बोटीचा शोध घेण्याचे प्रयत्न सर्वच स्तरातून चालू होते. या बोटीवरील खलाशी अद्याप परतलेले नाहीत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here