गोवळकोट जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची वर्ग खोलीअभावी गैरसोय

0
54

चिपळूण : गोवळकोट जिल्हा परिषद मराठी शाळेत विद्यार्थ्यांची वर्ग खोलीअभावी गैरसोय होत आहे. एकाच वर्गात पहिली ते सातवीचे 22 विद्यार्थी बसविण्यात आले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा तीनतेरा वाजले आहेत. याबाबतची व्यथा शाळा व्यवस्थापन समितीने तहसीलदार जयराज सूर्यवंशी व शिक्षणाधिकारी दादासाहेब इरणाक यांच्याकडे निवेदनाद्वारे मांडली आहे. शहरातील गोवळकोट कदम बौद्धवाडी येथे जुलै 2015 मध्ये दरड कोसळून 15 कुटुंबीयांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे त्यांचे स्थलांतर करण्यात आले होते. गोवळकोट शाळेत 8 कुटुंबीयांचे तर पेठमाप येथे 7 कुटुंबीयांचे पुनर्वसन केले आहे. त्यानंतर कायमस्वरूपी पुनर्वसनासाठी प्रयत्न झाले. मात्र अद्याप त्यास यश आले नाही. सध्या याचा परिणाम गोवळकोट जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांवर झाला आहे.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here