
परिवहन मंत्र्यांचा अॅक्शन प्लान तयार,कोणत्याही क्षणी मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आता ‘मेस्मा’ अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिला आहे. परिवहन मंत्र्यांचा अॅक्शन प्लान तयार असून कोणत्याही क्षणी मेस्मा अंतर्गत कारवाई करण्याची शक्यता आहे.
जर एसटी महामंडळानं ही कारवाई सुरु केली तर कोणत्याही नोटीशीविना या कर्मचाऱ्यांना अटक करण्याची शक्यता आहे. एक वर्षाचा कारवास देखील होऊ शकतो.अत्यावश्यक सेवेअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते.
मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून कोणत्याही क्षणी राज्यात कारवाईला सुरुवात होण्याची शक्यता आहे. व्हाट्सअॅप फॉरवर्ड करणारे किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवणारे यांच्यावरही कारवाईची शक्यता आहे.
www.konkantoday.com