
लग्नसराई हंगामात सोन्याचे दर उतरले
लग्नसराईत सोन्याला मागणी अधिक असते. याच काळात सोन्याचे दर कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे सोने खरेदी करण्यांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
लग्नसराई हंगाम सुरु असतानाच सराफा बाजारात बुधवारी सोन्याच्या दरात घसरण झाली. २४ कॅरेट सोन्याचा भाव प्रति तोळ्यामागे २५२ रुपयांनी स्वस्त होऊन ४७,८४९ (प्रति १० ग्रॅम) रुपयांवर आला. तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४४ हजारांच्या खाली आला. सराफा बाजारात बुधवारी २४ कॅरेट सोन्याचा भाव ४७,८४९ रुपयांवर खुला झाला होता. मंगळवारी सोन्याचा भाव ४८,१०१ रुपयांवर होता. त्यात बुधवारी घसरण झाली.
इंडियन बुलियन ज्वेलर्स आणि असोशिएशनच्या (IBJA) माहितीनुसार, बुधवारी (दि.१ डिसेंबर) २३ कॅरेट सोने ४७,६५७ रुपये, २२ कॅरेट सोने ४३,८३० रुपये, १८ कॅरेट सोने ३५,८८७ रुपये आणि १४ कॅरेट सोन्याचा भाव २७,९९२ रुपये होता. तर चांदीचा भाव प्रति किलो ६२,२१८ रुपये होता.
wwwkonkantoday.com