
वादळसदृश्य वातावरणामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या इशार्यामुळे मच्छिमार धास्तावले
गेले चार ते पाच दिवस सततच्या बिघडलेल्या वादळसदृश्य वातावरणामुळे आणि हवामान विभागाने दिलेल्या इशार्यामुळे मच्छिमार बांधव धास्तावले आहेत. त्यांनी जयगड, दाभोळ व आंजर्ले खाडीचा आश्रय घेतला. या तिन्ही ठिकाणी ५०० हून अधिक नौका आल्या आहेत. सध्या बंपर मासळी मिळायला लागली होती. त्यातच हवामान खराब झाल्याने मच्छिमारांचे मोठे नुकसान होणार आहे. www.konkantoday.com