
आंबा घाटातून सहाचाकी आणि २० टन वजनी गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने (नॅशनल हायवे अॅथॉरिटी ऑफ इंडिया) रत्नागिरी-कोल्हापूर महामार्गावरील आंबा घाटातून सहाचाकी आणि २० टन वजनी गाड्या सुरू करण्यास हिरवा कंदील दिल्याने वाहतूक सुरू झाली.संदर्भातील पत्र प्रकल्प संचालक वसंत पंदरकर यांनी रत्नागिरी, कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यामुळे सुमारे चार महिन्यांनंतर एसटी प्रवाशांसह विविध उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.त्यानुसार आंबा घाटातील तीन ठिकाणी तात्पुरता वळण रस्ता तयार करण्यात आला. हे काम पूर्ण झाले. ‘एनएचआय’च्या अधिकाऱ्यांनीही पाहणी करून हा मार्ग वाहतुकीला सक्षम असल्याचे पत्र दिले. जास्त वजनाच्या वाहनांवर प्रादेशिक परिवहन विभाग लक्ष ठेवेल; तर महामार्ग पोलिस वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी बंदोबस्त ठेवणार आहेत. ‘एनएचआय’कडून पत्र प्राप्त झाल्यावर तत्काळ वाहतूक सुरू करण्यात आली आहे.आंबा घाटातून वीस टनापेक्षा अधिक गाड्या जाऊ नयेत, यासाठी वाहतूक पोलिस बंदोबस्त ठेवणार आहेत. घाटावर कोल्हापूरचे, तर साखरपा येथे रत्नागिरी महामार्गाचे पोलिस बंदोबस्तास असणार आहेत
www.konkantoday.com