चिपळूण नगरपालिका निवडणुकीत नेत्यांचे वारसदार निवडणूक मैदानात
माजी आमदार रमेश कदम आणि विद्यमान आमदार तथा माजी मंत्री भास्कर जाधव या दोन नेत्यांचे वारसदार यावेळी पालिका निवडणुकीत उतरणार असल्याची उघड चर्चा सुरू आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.
चिपळूण शहरात पालिका निवडणुकीचे वारे जोरदार वाहू लागले आहेत. प्रत्येक पक्षाने निवडणुकांची तयारी सुरू केली असून उमेदवार चाचपणी सुरू करण्यात आली आहे. प्रभाग रचना आणि आरक्षणाबाबत अंदाज बांधले जात आहेत. त्यानुसार इच्छुकांची संख्याही वाढत आहे. आमदार जाधव यांचे सुपुत्र समीर जाधव यापूर्वी पालिका निवडणुकीत निवडून आले होते परंतु आता ते थेट शिवसेनेचा धनुष्यबाण घेवून निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचे खात्रीशीर वृतआहे
www.konkantoday.com