
दुसऱ्यांना उखडता-उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना?,संजय राऊत यांचा भाजपला इशारा
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडून टाका, असे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी महाराष्ट्र भाजपनेते- पदाधिकाऱ्यांना दिले. याच पार्श्वभूमीवर आजच्या सामना अग्रलेखातून शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे.दुसऱ्यांनाउखडता-उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना?, असा सवाल विचारत जरा जपून बोलण्याचा सल्ला राऊतांनी भाजप नेत्यांना दिला आहे.
महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचे. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवले आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता-उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून!
www.konkantoday.com