राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता यांच्या दक्षिण मुंबईतील सदनिकेवर प्राप्तिकर विभागाने टांच आणली
बेनामी मालमत्ताप्रकरणी राज्याचे माजी मुख्य सचिव आणि महारेराचे अध्यक्ष अजोय मेहता यांच्या दक्षिण मुंबईतील सदनिकेवर प्राप्तिकर विभागाने टांच आणली आहे. या कारवाईमुळे मेहता यांना या घराचा कोणताही व्यवहार परस्पर करता येणार नाही.अजोय मेहता यांनी मंत्रालयासमोरील समता इमारतीत केलेली घरखरेदी ही वादात सापडली होती. बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कंपनीचा त्या मालमत्तेशी संबंध असल्याचा आरोप आहे. त्यातूनच प्राप्तिकर विभागाने बेनामी मालमत्ताप्रकरणी चौकशी के ली होती
www.konkantoday.com