वसुबारस च्या दिवशीच गोमातेची तस्करी. हिंदुराष्ट्र सेना व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांचा गो तस्करांना दणका
सर्व दिवाळीच्या तयारित असताना वसु बारस हा सण मोठ्या प्रमाणावर गाईं चे वासरांचे पुजन करुन साजरा केला जातो अन याच पवित्र दिवशी गाई वासरांना कत्तलखान्यातनेत असताना पकडण्यात आले .दाभोळे गावानजिकगाडीन.MH11AG4379 ही गाडी गुरं घेऊन घेऊन जात असल्याची माहीती मिळताच हिंदुराष्ट्र सेना व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे कार्यकर्ते तिथे पोहचले व गाडी पकडली असता त्यामधे दोन गाई व एक वासरु असा गोवंश बेकायदेशिर रित्या वाहतुक करताना सापडला,व सदर गोवंश व चालक सोनी यास पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले व याचे दोन साथिदार फरार झाले.सदर व्यक्तिवर गुन्हा नोंद झाला असुन. गुन्हा नोद होत असतानाच पोलीस चेक पोस्ट मुर्शी समोरुनच दुसरी गाडी न.Mh09FL2838 ही गुरे घेऊन जात असताना पकडली व यातिल चालक रझाक काझी व त्याचा सहकारी साताब आदमापुरे यांना पकडुन पोलिसांच्या ताब्यात दिले.पुढील कारवाइ पोलीस करत आहेत.यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते जमा झाले होते.सदर व्यक्तींवर व यामध्ये सामिल असलेल्या दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी हिंदुराष्ट्र सेना व श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांनी निवेदनाद्वारे केली आहे.यावेळी सागर कदम चंद्रकांत राऊळ,प्रनित दुधाने,गणेश गायकवाड,सुशिल कदम,सागर विचारे,अक्षय लाखण,सुरज शिर्के,धनंजय कणावजे,संतोष केळकर,सागर वैध, अजय पवार,निखिल भोसले व इतर उपस्थित होते.
www.konkantoday.com