जिल्ह्यात दोन हजारांहून अधिक गृहनिर्माण संस्था, मतदार अवघे १७५!

0
41

जिल्ह्यातील विकास सेवा सहकारी सोसायट्या हा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गणा आहे. यातील काही संस्थाना आयत्यावेळी मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप गुहागर तालुक्यातून होत आहे. त्याचबरोबर गृहनिर्माण, गृहतारण सहकारी संस्था व पगारदार नोकरांच्या संस्थांचे प्रतिनिधी देखील जिल्हा बँकेचे मतदार आहेत. मात्र जिल्ह्यातील बहुतांशी गृहनिर्माण संस्थांना याची माहितीच देण्यात आलेली नाही. जिल्ह्यात सुमारे २ हजार गृहनिर्माण सहकारी संस्था असताना मतदार यादीत या घटकांचे अवघे १७५ मतदार असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here