पोलिसांच्या चालक भरतीतील लेखी प्रश्‍नपत्रिकेतील प्रश्‍न पाहून परीक्षार्थी हैराण, उत्तरे देण्यापेक्षा गाडी चालविणे सोपे

0
79

रत्नागिरी जिल्ह्यातील पोलिसांमध्ये चालक (ड्रायव्हर) भरतीसाठी परवा लेखी परीक्षा झाली. त्यामध्ये देण्यात आलेल्या परीक्षेत चालकांना वाहनातील किंवा ट्रॅफिक नियमांवर आधारित असलेल्या प्रश्‍नापेक्षा जनरल नॉलेजचे प्रश्‍न पाहून परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांना घाम फुटला.
या प्रश्‍नपत्रिकेत ब्रिटीश हिंदुस्थानचे पहिले गव्हर्नर कोण? मिझोरामची राजधानी कोणती? राज्यातील दशलक्षी महानगर पालिकेची संख्या किती, राष्ट्रपतींना कोणत्या कलमाखाली आणीबाणी जाहीर करता येते, ध्वनीचा अभ्यास याचे नाव  वाचून भारतीय केंद्रीय मंत्रीपद भूषविणारी महिला कोण, गडचिरोली जिल्ह्यातील मार्कंडी देवस्थान कोणत्या नदीवर आहे. लोकमान्य टिळकांचा जन्म कधी झाला पासून १८ मार्च २००९ हा दिवस सोमवार असेल तर १८ मार्च २०१५ कोणता वार असेल आदी प्रश्‍न विचारण्यात आले होते.
या शिवाय परिक्षेला बसलेल्या उमेदवारांचे गणिताचे ज्ञानही अजमावण्यात आले. एका व्यक्तीने ११४० रुपयांला घड्याळ विकल्यास ५% तोटा झाला. ते घड्याळ ५% नफा मिळविण्यात किती रुपयांना विकले पाहिजे. एका प्राणीसंग्रहालयात वाघ आणि मोर यांची एकूण संख्या ४० असून त्यांच्या पायाची संख्या १२० आहे तर प्राणी संग्रहालयात वाघ किती ?असे ६० प्रश्‍न वेगवेगळ्या जनरल नॉलेजवर आधारलेले होते. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांना घाम फुटला. याची उत्तरे देण्यापेक्षा वाहन चालविणे सोपे असल्याचे वाटून गेले.
साठ प्रश्‍नापासून ८० प्रश्‍नापर्यंत प्रश्‍न वाहन चालकांच्या संबंधित म्हणजे वाहन व त्यांच्या नियमाविषयी होते त्यामध्ये वाहनाची चिन्हे, वाहतुकीचे नियम यांच्या विषयी माहिती विचारण्यात आली होती की जी विद्यार्थ्यांना माहिती होती.
त्यानंतर परत शेवटचे प्रश्‍न परत क्रियापदाचा अर्थ शोधा पासून उचित पर्याय शोधा, विभक्ती शोधा, काळ ओळखा, वाक्याचा प्रकार ओळखा असून १०० वा प्रश्‍न देखील विशेषणाचा प्रकार ओळखा असा होता.
त्यामुळे प्रश्‍नाचा असा भडीमार पाहून परीक्षा देण्यासाठी परीक्षार्थी हैराण झाले. आपण नक्की पोलीसमध्ये चालकाची परीक्षा द्यायला आलो आहे की मोठ्या पदाची परीक्षा असा प्रश्‍न त्यांना पडला होता.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here