शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्यात माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते व रामदास कदम यांची गैरहजेरी?

0
62

उद्या १५ ऑक्टोबरला मुंबईत षणमुखानंद हॉलमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मर्यादीत नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दसरा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे.यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवसेना नेता रामदास कदम यांची अनुपस्थिती दिसू शकते. निमंत्रितांच्या यादीतून रामदास कदम यांचे नाव वगळण्याचे संकेत मिळत आहेत.माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांना सुद्धा दसरा मेळाव्यापासून लांब ठेवण्यात येऊ शकते असे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. मध्यंतरी अनंत गीते यांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली होती.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here