सिंधुदुर्गातील विकास पर्व रत्नागिरीत दिसण्यासाठी बदल अपरिहार्य – ॲड. दीपक पटवर्धन

0
62

सिंधुदुर्गात आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ९ तारखेला उद्घाटन होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून विभागून बाहेर पडलेल्या जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेडिकल कॉलेज अशा अनेक सुविधा बहाल होत असतांना रत्नागिरी जिल्ह्यात विमानतळ जाऊ दे गुळगुळीत रस्तेही नाहीत. रत्नागिरी खड्ड्याने व्यापली अशी स्थिती आहे. कोट्यावधीच्या मंजूऱ्या झाल्याचे घोषित होते. मात्र रत्नागिरीकरांना खड्डेमय रस्तेच नशिबी आहेत. आता ऑक्टोबर मधली तारीख मिळाली आहे. तोपर्यंत रत्नागिरीतील जनतेने खड्ड्यात रस्ते शोधावेत. सिंधुदुर्गातले आपले सुदैवी जिल्हावासिय विमानातून उड्डाण करतील. मात्र आपल्याकडे साधा एस.टी. स्टँड ही आपल्या नशिबी नाही. अनेक वर्षे रखडत बंद पडलेले एस.टी. स्टॅन्डचे काम रत्नागिरीची शोभा वाढवत आहे. हा नाकर्तेपणा, नियोजनशून्य कामकाज हा स्थायीभाव झाला आहे असे ॲड.दीपक पटवर्धन म्हणाले केली.
रायगड, सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालय होतात. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात वैद्यकीय विद्यालयाची गरज नाही. कारण इथल्या विद्यार्थ्यांचे भवितव्य रत्नागिरी एस.टी. स्टँड सारखे विष्पन्नच ठेवणाऱ्यांसाठीच परत परत विजय मिळतो आहे. रत्नागिरीत वैद्यकीय कॉलेजची घोषणा होते. मात्र लालफितीत निर्णय गायब होतो. रत्नागिरीकर सुज्ञ, रत्नागिरीकर संयमी, सुसंस्कृत त्यामुळे वैद्यकीय कॉलेज परिपूर्ण मुंबई विद्यापीठ उपकेंद्र, औद्योगिक प्रकल्प यांची रत्नागिरीत गरज नाही असा ठाम विश्वास निर्माण झाला आहे. हा विश्वास निर्माण करण्यात येथील राजकीय व्यवस्था यशस्वी झाली आहे.
रत्नागिरीचे जिल्हारुग्णालय खूप मोठे पण पूर्णवेळ फिजिशियन तेथे नाही. इमारत गळकी आहे. पूर्ण क्षमतेचा वीज पुरवठा तेथे नाही. जुनाट जनरेटर बदलण्यासाठी निधी नाही. नव्याने उभारलेले महिला रुग्णालय बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. जिल्हा रुग्णालयांत पुरेसे तज्ञ वैद्यकीय अधिकारी नाहीत. कि पुरेसा स्टाफ नाही. याच सोयरसुतक नाही. रत्नागिरीत एक हि नवा औद्योगिक प्रकल्प येऊ द्यायचा नाही. युवकांचे भवितव्य अंधकारमय करायच हा चंग जणू बांधला आहे.
लोकमान्य टिळकांच्या नावाने असलेली मराठी शाळा जमीनदोस्त होते . अनेक मराठी शाळा बंद पडतात. मात्र कोणतेही शैक्षणिक धोरण जाहीर होत नाही. चर्चा होत नाही. लोकप्रतिनिधींची असलेली ही नकारात्मक कृती सत्तेच्या कैफातून आली आहे का ? असा प्रश्न पडतो.
विकासाची दिशा, नवनवे प्रकल्प, शैक्षणिक सुविधा, प्रशस्त रस्ते, पायाभूत सुविधा, सांस्कृतिक केंद्र हि रत्नागिरीकरांनी फक्त पिक्चर वर चॅनेल वर पहायची ती स्वतः रत्नागिरीत अनुभवायला मिळणार नाहीत असा विश्वास इथल्या वारंवार सुकायू हाती प्राप्त झालेल्या यंत्रणेने, व्यवस्थेने निर्माण केला आहे. नकारात्मक स्थितीतून रत्नागिरी जिल्ह्याला बाहेर काढण्यासाठी व्यवस्थेत बदल घडवून आणणे आवश्यक आहे. व्यवस्थेमध्ये एकजूटीपणा आलाय. अधिकाराचा दर्प हि जाणवतो आहे. रत्नागिरीतील प्रत्येक नागरिकाच्या मनात असंतोष खदखदतोय. हा असंतोष जाणून घेवून भा.ज.पा.च्या संपूर्ण संघटनेने राजकीय कृतिशीलता दाखवत बदल घडवण्याचा संकल्प करूया. रत्नागिरीच्या भवितव्याचे भाग्यविधाते होऊ या असे ॲड.दीपक पटवर्धन यांनी जिल्हा बैठकीत बोलतांना केले. जिल्हा बैठकीत श्री.राजेश सावंत, श्री.यशवंत वाकडे, सचिन वहाळकर, सुशांत चवंडे,सचिन करमरकर, मुन्ना खामकर, रवि नागरीकरण,प्रमोद अधटराव,ऐश्वर्या जठार, अॅड .महेंद्र मांडवकर व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here