मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचालकाला चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार,नितीन गडकरी यांची नवी योजना

0
96

केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी प्रशासनाला नवे आदेश दिले असून त्यानुसार ट्रक चालकांच्या चुकांमुळे किंवा त्यांना ट्रक चालवताना डुलकी लागल्यामुळे होणाऱ्या अपघातांना यामुळे आवर घालण्यास मोठी मदत होणार आहे. मालवाहू ट्रकचालक लांब पल्ल्याचे प्रवास करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल वाहून नेत असतात. त्यामुळे या प्रवासादरम्यान त्यांना डुलकी लागण्याची देखील शक्यता असते. अशाच काही प्रकरणात मोठे अपघात झाल्याचं देखील दिसून आलं आहे. त्यामुळेच ट्रकचालकांना डुलकी लागू नये, यासाठी देशातील सर्व व्यावसायिक वापराच्या ट्रकमध्ये On-Board Sleep Detection Sensors अर्थात चालकाला डुलकी लागल्यास लागलीच वाजणारे सेन्सर्स बसवले जाणार आहेत. त्यामुळे अशा प्रकारांचं प्रमाण कमी होऊ शकेल.देशात विमान व्यवसायामध्ये ज्या प्रमाणे पायलटच्या विमान उड्डाणाचे तास निश्चित असतात, त्याचप्रमाणे ट्रकचालकांचे देखील ड्रायव्हिंगचे तास निश्चित करण्याचे निर्देश यावेळी नितीन गडकरी यांनी दिले आहेत. त्यामध्ये सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून जिल्हा रस्ते समितीच्या नियमित बैठका होतील याची काळजी घेण्याचे निर्देश देणार असल्याचं गडकरींनी सांगितलं. तसेच, ट्रक चालकांसाठी ड्रायव्हिंगचे तास देखील निश्चित करण्याचे निर्देश या पत्रांमधून देणार असल्याचं गडकरींनी सांगितलं.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here