निवळी -जयगड मार्गावरील अवजड वाहतुकीवर आर टी ओ अधिकाऱ्यानी निर्बंध न घातल्यास बहुजन समाज पार्टी आंदोलन छेडणार

0
75

(रत्नागिरी) निवळी -जयगड या मार्गावर जिंदाल कंपनी च्या आणि आंग्रे पोर्ट वरुन मालाच्या आयात निर्यात केली जाते, त्यासाठी मालाची, कोळसा, उसाची मळी, धान्य, साखर, खते, बाँक्साइट चा वाहतुक अवजड वाहनांच्या माध्यमातून केली जाते, ही वाहने बारा चाकी, चौदा चाकी अशी असतात, काही वर्षांपूर्वी या वाहतुकीला सायंकाळी सहा नंतर सकाळी आठ वाजेपर्यंत वाहतुकी साठी वेळ होता, परंतु आता ही वाहतुक आता राजरोस पणे दिवसभर सुरु असते.त्यामुळे रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहेच पण ही होणारी वाहतुक सुरक्षित आणि प्रमाणाबाहेर लोडींग करुन वाहतुक होत असल्याने चढात वळणात , रस्त्याच्या मधोमध या गाड्या बंद पडतात. त्यामुळे दोन चाकी, तीन चाकी, चारचाकी वाहन चालकांची गाडी चालवताना कसरत होते.* त्याचबरोबर सदर गाड्यांचे चालक हे दिवसा- रात्री गाडी चालवत असताना मद्यपान करुन ड्रायव्हिंग करतात त्यामुळे या रस्त्यावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. निवळी ते जयगड मार्गालगतच जास्त लोकवस्ती चा गावे असल्याने सतत नागरिकांची वर्दळ असते. जाकादेवी, चाफे, खंडाळा आणि जयगड येथे शाळा, महाविद्यालये असल्याने विद्यार्थी ये जा करतात, त्यांच्या साठीही हा मार्ग असुक्षित झाला आहे, अवजड वाहने ही खूप वेगाने असते म्हणून दोनचाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनचालक जीव मुठीत धरून गाड्या चालवतात तसेच ओव्हर लोड गाड्या रस्त्यावर बंद पडतात त्याही बिनधास्त तिथेच उभ्या करुन ठेवल्या जातात, अशाप्रकारे हा मार्ग पूर्ण या अवजड वाहतुकीमुळे असुरक्षित आहेच त्याचबरोबर अतिप्रमाणात होणार्‍या वाहतुकीने रस्ता संपुर्ण खड्डेमय झाला आहे. *वाहतुकीवरील नियंत्रणासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी आणि त्याची टीम कार्यरत असते पण दुर्दैवाने ही त्यांना अवजड वाहतुक दिसत नाही पण बाकी इतर वाहन धारक दिसतात त्यांच्या वर कारवाई केली जाते, पण अवजड वाहतुकीला यांचा का आशिर्वाद आहे...???? याचे अर्थकारण काय..???? असा प्रश्न नागरिकांना पण पडत आहे.*

आम्ही गेल्या वर्षी ही कोरोना काळात रस्तावरुन दुचाकी वाहन धारकाना विनाकारण चुकीच्या कारणांनी सक्तीचा दंड आकारवून वसुल करुन घेत होते त्यावेळी आम्ही बहुजन समाज पार्टी च्या माध्यमातून पुराव्यानिशी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन देउन, भेटण्यासाठी वेळ मागितला कारण तेव्हाही निवळीजयगड मार्गावर राजरोसपणे ओव्हरलोड, असुरक्षित वाहतुक सूरु होती तिकडे दुर्लक्ष करून उपप्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी रत्नागिरीत दंड वसुली करीत होते, ही गंभीर बाब, आम्हाला निदर्शनास आणून द्यायची होती, तरीही तत्कालीन अधिकाऱ्यांनी वेळ दिला नाही.म्हणुन आताही या मार्गावर खूप ओव्हरलोड, असुरक्षित वाहतुक होत असल्याने हा मार्ग पूर्णपणे असुरक्षित असल्याने उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी सदर बाब गंभीरपणे घेउन अवजड वाहतुकीला रात्री आठ ते सकाळी सात असा विशिष्ट वेळ देउन वाहतुक ठेवावी, जेणेकरून नागरिक, इतर वाहनधारक सुरक्षित प्रवास करतील. जर या गंभीर बाबीची दखल घेतल्यास आम्ही बहुजन समाज पार्टी च्या वतीने निवळी येथे अवजड, ओव्हरलोड वाहतूक बंद करण्यासाठी आंदोलन छेडू,असा इशारा बहूजन जिल्हाप्रभारी अनिकेत पवार यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here