![](https://konkantoday.com/wp-content/uploads/2021/07/img_5506.jpg)
गीते यांची अवस्था आता सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”-खासदार सुनील तटकरे
शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेला आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी जशास तसं उत्तर दिलं.
अनंत गीते यांनी जे वक्तव्य केलं, त्याबाबत मी बोलणार आहे. अनंत गीते यांनी केलेली वक्तव्ये नैराश्यातून आहेत, ते अडगळीत पडले आहेत. त्यांच्या बोलण्याने पवार साहेबांचं कर्तृत्व कमी होणार नाही. अतिनैराश्यापोटी राजकीय भान हरपून केलेली टीका आहे. राज्याला, देशाला पवार साहेबांचं काम माहिती आहे. गीते यांची अवस्था आता सांगताही येत नाही, सहनही होत नाही अशी झाली आहे. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रयत्न आहे”, असं सुनील तटकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांचं कामाचं कौतुक होत असताना अडगळीत पडलेल्या नेत्यांकडून काही वक्तव्य येत आहेत. गीतेंची टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. त्यांच्या विधानाला महत्व देण्याचं कारण नाही, असं सुनील तटकरे म्हणाले.
www.konkantoday.com