सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर

सायबर क्राईमच्या वाढत्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर पोहचला आहे. २०२० मध्ये सायबर क्राईम प्रकरणी राज्यात तब्बल ५ हजार ४९६ गुन्हे दाखल करण्यात आले, अशी माहिती नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर आली आहे.
उत्तर प्रदेशमध्ये सायबर क्राईमचे प्रमाण सर्वाधिक असून गेल्यावर्षी राज्यात ११ हजार ९७ गुन्हे दाखल करण्यात आल्याचे एनसीआरबीच्या अहवालातून सांगण्यात आले आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या कर्नाटकमध्ये २०२० मध्ये १० हजार ७४१ गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्राखालोखाल तेलंगणामध्ये ५ हजार २४ तसेच उत्तर-पूर्वेकडील आसाममध्ये सर्वाधिक ३ हजार ५३० गुन्हे सायबर क्राईम संबंधी दाखल करण्यात आले.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button