
७२ तासांच्या आत सर्व ट्विट डिलिट करून बिनशर्त माफी मागावी अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकू परिवहन मंत्री अनिल परब यांचा किरीट सोमय्या यांना इशारा
किरीट सोमय्या यांच्यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी १०० कोटींचा दावा ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर आता परिवहन मंत्री अनिल परब यांनीही तसाच इशारा दिला आहे.७२ तासांच्या आत सर्व ट्विट डिलिट करून बिनशर्त माफी मागावी अन्यथा १०० कोटींचा दावा ठोकू असा इशारा परब यांनी दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील मंत्री आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.
परिवहन विभागातील बदली, पदोन्नतीमध्ये अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनिल परब यांनी कोट्यवधींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे.
याप्रकरणी आता परिवहन मंत्री अनिल परब यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या यांना तब्बल १०० कोटीच्या मानहानीच्या दाव्याची नोटीस वकिलामार्फत पाठवली आहे.
www.konkantoday.com