मुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांमध्येच पूर्ण होणार

देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जाेडणाऱ्या महत्त्वाकांक्षी ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे बनविला जात आहे.तब्बल १ लाख काेटी रुपये खर्च करून हा ८ पदरी महामार्ग बांधण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे, एक्स्प्रेस-वेमुळे हे अंतर १५० किलोमीटरने कमी होणार असून केवळ मुंबई-दिल्ली प्रवास केवळ १३ तासांमध्येच पूर्ण होणार आहेकेंद्रीय महामार्ग विकास आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले, की देशातील दाेन प्रमुख महानगरांना जाेडणारा १३५० किलाेमीटर लांबीचा ग्रीनफिल्ड एक्स्प्रेस-वे जानेवारी २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. एक्स्प्रेस-वेमुळे मुंबई-दिल्ली अंतर १५० किलाेमीटरने कमी हाेणार आहे. तसेच वाहतुकीस अडथळे कमी असल्याने दरवर्षी ३२ काेटी लीटर इंधनाची बचत हाेईल, असा अंदाज आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button