संगमेश्वर मापारी मोहल्ल्याची पोरं हुशार…! अखेर सोनवी पूल केला खड्डे मुक्त…

0
52

रत्नागिरी प्रतिनिधी

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वरती मोठमोठे खड्डे पडले असताना संबंधित विभागाला वेळोवेळी पत्रव्यवहार करून सुद्धा जागा न  आल्याने अखेर संगमेश्वर तालुक्यातील मापारी मोहल्ला येथील युवकांनी आज स्वखर्चातून सोनवी पुलावरील पडलेले मोठमोठे खड्डे भरले आहेत. राष्ट्रीय महामार्गाची परिस्थिती बिकट झाली असताना महामार्गावर ती मोठमोठे खड्डे पडले असून यामध्ये रोज अपघात होत आहेत आणि या अपघातामुळे अनेक लोक जखमी आणि मृत्यू सुद्धा झाले आहेत याची जाणीव संबंधित प्रशासनाला नसल्यामुळे येथील युवकांनी एकत्र येत महामार्गावरील खड्डे भरण्याचा निर्णय घेऊन आज सकाळपासून संगमेश्वर मापारी मोहल्ला मित्र मंडळाच्या वतीने संगमेश्वर सोनवी पुलावर अतिधोकादायक असलेले खड्डे भरण्यात आले या खड्ड्यांना मुळे होणारे अपघात आता करणार आहेत. गणेश भक्तांचे स्वागत यावे खड्ड्यातून झाले मात्र त्यांचा निरोप इ. खड्ड्यातून होणार आहे आणि या खड्ड्यांमध्ये रात्री-अपरात्री छोटे-मोठे अपघात होते याची जाणीव संबंधित विभागाला असतानासुद्धा त्यांनी त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची मलमपट्टी केली नाही किंवा खड्डे सुद्धा भरले नाही मा. उच्च न्यायालयाने महामार्गावरील पडलेले खड्डे भरावेत असे निर्देश राष्ट्रीय महामार्गाला दिले मात्र न्यायालयाच्या आदेशाला सुद्धा राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी केराची टोपली दाखवल्याचे दिसून आले आहेत या ठिकाणी पडलेले खड्डे भरत नसल्यामुळे युवकांनी एकत्र येत सोनवी पुलावरील खड्डे भरले असून प्रशासनाला आणि संबंधित विभागाला उर्वरित खड्डे भरण्याची विनंती केली आहे जर राहिलेले खड्डे  भरले नाही तर जेवढे खड्डे या युवकांना  भरता येतील तेवढे खड्डे भरण्याची   तयारी मापारी मोहल्ल्यातील  युवकांनी दाखवली आहे. खड्डे भरण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते गुलाम पारेख, विवेक शेरे, मोसीन मनेर, रहुफ खान, रजीम खान,अझर खान, जुनेद खान, वसीम मापरी, दानिश पटेल, जमीर मुजावर, मुबीन पारेख, हनिफ गवंडी, शानवाज खान, जोहेब सय्यद, खुलचंद पासवान अशापाक खान, वसीम मनेर, सागर वेल्लाळ आदी उपस्थिती होते. साहित्य आण्यासाठी टेम्पो ओंकार भिडे यांनी दिला तर जे. सी. पी. अमोल सावरकर यांनी दिला त्यांचे सगळ्यांनी आभार मानले.

www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here