कोरोनाचे आकडे कमी झाले तर दसरा, दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे पुन्हा उघडली जाऊ शकतात -आरोग्य मंत्री राजेश टोपे

0
51

कोरोनामुळे राज्यातील मंदिरे, धार्मिक स्थळे बंदच राहतील. कोरोनाचे आकडे कमी झाले तर दसरा, दिवाळीनंतर राज्यातील मंदिरे पुन्हा उघडली जाऊ शकतात, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे.कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्यामुळे बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. पण, थिएटर, धार्मिक स्थळे याबाबत निर्णय झाला नाही. सध्या सणांचे दिवस आहेत. दसरा, दिवाळी तोंडावर असून कोरोनाबाधितांचे प्रमाण घटल्यास मंदिरे उघडण्याबाबत निर्णय शक्य असल्याचे त्यांनी सांगितले.
हा निर्णय टास्क फोर्सशी चर्चा करून घेतला जाईल. आपत्ती व्यवस्थापनचे प्रमुख या नात्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच याबाबत अधिकार आहेत, अशी स्पष्टोक्ती आरोग्यमंत्री यांनी दिली.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here