चिपी विमानतळाच्या उद्घाटनाबाबत आपल्याला कल्पना नाही – माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू

चिपी विमानतळाचे उद्घाटन येत्या ९ ऑक्टोबरला करण्यात येणार असल्याचे भाजप आणि शिवसेनेकडून जाहीर केले आहे; मात्र या विमानतळाचे उद्घाटन कधी होत आहे याची आपल्याला कोणतीही कल्पना नसल्याचे माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी स्पष्ट केले
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर मालवण-मेढा येथे मूळ गावी आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू याबाबत बोलताना सांगितले चिपी विमानतळाचे भूमिपूजन मी केंद्रीयमंत्री व नारायण राणे उद्योगमंत्री असताना झाले होते. त्यानंतरच्या काळात या विमानतळाचे काम रखडले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जेव्हा आपल्याकडे नागरी उड्डाण मंत्रीपदाची जबाबदारी दिली. त्यावेळी पहिल्याच बैठकीत चिपी विमानतळाचा आढावा घेत यात ज्या परवानग्या आवश्यक होत्या त्या मिळवून दिल्या.
विमानतळाचे काम पूर्ण झाल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या विमानतळाचे उद्घाटन झाले होते. हे विमानतळ राज्य सरकारचे असल्याने विमान टेकऑफ, लॅण्डींगसाठी ते योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याच विमानाने दिल्लीला गेलो. त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन हे फीत कापून न होता उड्डाण करून झाले होते. त्यानंतर राज्य शासनाकडून स्थानिक पातळीवर रस्ते, रनवे आदी कामे करायची होती त्यामुळे या विमानतळाचे उद्घाटन रखडले.या विमानतळाच्या सद्यःस्थितीबाबत काही माहिती नाही. कोणी जाहीर केले असेल तर त्यानुसार होईल. त्यामुळे त्यावर मी अधिक टिपण्णी करणार नाही असे स्पष्ट केले
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button