मेघालयच्या अपक्ष आमदारांला कोरोनाची एकही लस न घेतल्याने जिवाला मुकावे लागले
कोरोनाची लस घेणे किती फायद्याचे आहे, हे लस घेतल्यानंतर कोरोना झाल्यास कळते. मेघालयच्या अपक्ष आमदारांना कोरोना लस न घेतल्याने जिवाला मुकावे लागले आहे.आमदार सिंटार क्लास सुन यांचे शुक्रवारी कोरोनामुळे निधन झाले. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
सिंटार यांची कोरोनामुळे तब्येत खालावत चालली होती. मावंगपमध्ये त्यांच्या निवासस्थानी त्यांचा मृत्यू झाला. विधानसभेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सिंटार यांनी एकही कोरोनाची लस घेतली नव्हती. राज्यात असे सात आमदार आहेत, ज्यांनी अद्याप एकही लस घेतलेली नाही. सिंटार हे विधानसभेतील पर्यावरण समितीचे अध्यक्ष आणि राष्ट्रीय फुटबॉलपटू यूजीनसन लिंगदोहचे वडील होते.
www.konkantoday.com