कोकण आणि पूर्व विदर्भात या आठवड्यात पावसाच्या दमदार सरी
कोकण आणि पूर्व विदर्भात या आठवड्यात पावसाच्या दमदार सरी पडतील, तर उर्वरित राज्यात बहुसंख्य भागात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने शुक्रवारी वर्तविला.हवामान खात्याने १० ते १६ सप्टेंबरदरम्यानचा पावसाचा अंदाज वर्तविला. त्यात ही माहिती देण्यात आली.
राज्यातील बहुतांश भागात गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला. त्यामुळे राज्यातील पाऊस सरासरीपर्यंत वाढला. राज्यात सध्या हलक्या सरी पडत असून, १० ते १६ सप्टेंबर या आठवडाभरात कोकण, पूर्व विदर्भात सरासरीपेक्षा अधिक, तर उर्वरित राज्यात बहुतांशी भागात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला. राज्यातील बहुतांश भागात ऑगस्टमध्ये पावसाने दडी मारली. त्यामुळे पावसाळ्याचा शेवटचा महिन्यात पडणाऱ्या पावसाकडे डोळे लागले आहेत. या पार्श्वभूमिवर हवामान खात्याने अंदाज जाहीर केला.
www.konkantoday.com