
लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब
लालबागच्या राजाच्या प्राणप्रतिष्ठापना पूजेस विलंब झाला आहे.सकाळी १०:३० वाजता उत्सव गणेशमूर्तीची विधीवत पूजा सुरू करुन सकाळी ११ वाजता लालबागच्या राजाचं दर्शन सुरू करण्याचं नियोजन होतं. मात्र मुंबई पोलीस आणि लालबागचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकारी यांच्यात तासाभरापासून चर्चा सुरू असल्याने पूजेस विलंब झाला.
लालबागच्या राजाची स्थापना करणारे, स्थानिक व्यापारी आणि दुकानदारांना पोलिसांनी नोटीस पाठवून त्यांची दुकानं बंद केलीत. त्यामुळे लालबाग मार्केटमधील स्थानिक रहिवासी प्रचंड नाराज आहेत. लालबागच्या राजाच्या प्रत्यक्ष दर्शनाला पोलिसांनी बंदी घातली आहे. त्यामुळे बाहेरून कोणी भाविक लालबागमध्ये येणार नाही. मग स्थानिक रहिवाशांची दुकानं का बंद करण्यात आलीत, असा प्रश्न लालबाग मार्केटमधील रहिवाशी विचारत आहेत
www.konkantoday.com