राज्यात आता प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची मागणी जोर धरू लागली

0
44

करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या दीड वर्षांपासून देशासह राज्यातील सर्वच शाळा बंद आहे. ऑनलाईन वर्गांच्या माध्यमातून सध्या विद्यार्थ्यांना शिकवलं जात आहे. मात्र, आता प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची मागणी जोर धरत आहे.नववीपासून पुढचे सगळे वर्ग नियमित सुरु करा”, अशी मागणी शिक्षण संस्था महामंडळाने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे केली आहे. आठवड्यातून ४ दिवस ४ तास वर्ग सुरु ठेवू द्या. आम्ही मुलांची जबाबदारी स्वीकारतो, अशी ग्वाही देखील यावेळी या शिक्षण संस्था महामंडळाने दिली आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीतील काही प्रमाणात त्रुटी आणि मर्यादा समोर येत आहेत. त्यामुळे, आता लवकरात लवकर प्रत्यक्ष शाळा सुरु करण्याची ही मागणी होत आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here